मेढा / प्रतिनिधी
सकल मराठा समाजाच्या आरक्षण मागणी साठी व मराठ्यांचा योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनास पाठींबा व्यक्त करण्यासाठी जावली तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आजपासून मेढा बाजार चौकात बेमुदत साखळी उपोषणास सुरूवात करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण तालुक्यातील बाजार पेठा व्यापाऱ्यांनी उत्स्फुर्त पणेशंभर टक्के बंद ठेवून जिल्हा बंद च्या आवाहनाला प्रतिसाद दिला. आजच्या साखळी उपोषणासाठी विलासबाबा जवळ, सचिन करंजेकर, सुरेश पार्टे , प्रकाश कदम , शिवाजीराव देशमुख, सचिन जवळ, संतोष वारागडे , रोहीत देशमुख, संजय सुर्वे , संदीप पवार , श्रीरंग जवळ , अरूण जवळ, श्रीकांत . गोळे यांच्यासह . मेढा ग्रामस्थ , व तालुक्यातील मराठा बांधव साखळीउपोषणास बसले होते.

आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेढा येथील साखळी उपोषणस्थळी भेट देवून पाठींबा व्यक्त केला. तसेच अॅड. राजेंद्र वीर ,रिटकवली सरपंच सौ . शारदा मर्देकर, प्रा. तुकाराम ओंबळे, मोहन जगताप , महिगांवकर, समाजसेवक नामदेव मर्देकर यांच्यासह दिवसभरात विविध समाजातील बांधवांनी उपोषणस्थळी भेट देवून पाठींबा व्यक्त केला.

महाराष्ट्राबरोबरच जिल्हाबंदची आज हाक देण्यात आली होती त्याला साथ देवून आज जावली तालुक्यातील सर्व मेढा सह कुडाळ , करहर ,, आनेवाडी , केळ्घर , बाजारपेठा व्यापाऱ्यांनी शंभर टक्के बंद ठेवून पाठींबा व्यक्त केला.
- जावली तालुका सकल मराठा समाज्याच्या वतीने पुकारलेल्या बेमुदत साखळी उपोषणास समाजातील सर्व समाज बांधवांचा पाठींबा..
- एस. टी. बस वरील जाहीरातीमधील नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस , एकनाथ शिंदे , अजित पवार ,यांच्या फोटोंना काळे फासण्याचा प्रयत्न काही युवकांनी केला.
- तसेच अॅड. सदावर्ते, एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस , अजित पवार , छगन भुजबळ यांचे फोटो गाढवाच्या गळ्यात बांधून धिंड काढण्यात आली.
