जावली तालुक्यातील राष्ट्रीय पातळीवर मास्टर्स गटामध्ये वेगवान धावपटू म्हणून कामगिरी केलेल्या कुडाळ गावचे सुपुत्र इम्तियाज मुजावर यांची मुंबई येथे होणाऱ्या 43 व्या राष्ट्रीय मास्टर्स अॅथलेटिक्स मैदानी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.याबद्दल परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
43 वी राष्ट्रीय मास्टर्स अॅथलेटिक्स मैदानी स्पर्धा ही दि, 26 एप्रिल ते 28 एप्रिल 2024 दरम्यान सोमय्या विद्या विहार युनिव्हर्सिटी,क्रिडासंकूल,विद्या विहार ( ई ) मुंबई.येथे होणार आहे. विविध वयोगट व क्रिडा प्रकारात ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा मास्टर्स अॅथलेटिक्स संघटनेने 31 पुरुष व 35 महिला अशा एकूण 66 खेळाडूंची निवड केली आहे.
यामध्ये सातारा जिल्हयातील जावलीच्या कुडाळ गावचे वेगवान धावपटू म्हणून इम्तियाज मुजावर यांची स्पर्धेसाठी निवड झाली असून जावलीकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे. तसेच दररोज न चुकता रनिंगचा खडतर सराव इम्तियाज मुजावर यांनी केला आहे.
या राष्ट्रीय स्पर्धेच्या पुरुष कर्णधारपदी सतिश मडके यांची तर महिला कर्णधार पदी स्नेहा कुदळे यांची निवड करण्यात आली आहे.
यामध्ये पुरुष गट संघ पुढील प्रमाणे:
सतिश मडके,( पुरुष कर्णधार,)
प्रतिक घोष, स्टिव्हन झुझार्ट, रणजित सावंत, अशोक यादव, अजय कांबळे, आशिष गायकवाड, रामचंद्र जाधव, संतोष खांडीझोड,संजय शिंदे, अविनाश भंडारे, इम्तियाज मुजावर, रोहीत तावडे, राहुल माळी, अनंत टोले, अमर डोळे, प्रसाद पाटील, राम जागडे, मार्क भस्मे, बाबू तांबे, जिग्नेश पटेल,जेम्स ईथियॉंग, सुनील महाडिक, मनोज ओव्हाळ, मनोज दिसले, क्लिमेंट अॉगस्टीन, ग्यानसिंग चौहान, बाबू सावर्डेकर, हरिषचंद्र थोरात, धिरेंद्रसिंग यादव,लक्ष्मणराव दहिहांडे असा पुरुष संघ असणार आजे.
महिला गट संघ पुढीलप्रमाणे:
स्नेहा कुदळे (महिला कर्णधार,)
भावना मेहरा, सोनिया शिंदे, पुनम देवकाते, रिचा सरिन,पल्लवी मावळे, हसिना शेख, ज्योती पासलकर, गुलनाझ खांडीझोड, सुवर्णा शेलार, मनिषा डेंगळे, मनिषा सातपुते, माविस अॅडम, माधुरी भागवत, रेणू शर्मा, रेवती मोरे, स्मिता सकपाळ, स्नेहा भिसे, कुमकुम सिरोही, वैशाली कुलकर्णी, अस्मिता सावंत,अंजली वर्टी, संगिता भांगरे, स्मिता मस्तमरडी, सोनाली दांडेकर, आश्विनी महाजन, मरिना सॅबेस्टीन, सिमा द्रव्यकार, ज्योती शेंडे, वृषाली शिंदे, माधुरी खराडे,रुथ गायकवाड,अनिता दरेकर, रुपाली पाटील, राधिका पाटील या स्पर्धेसाठी राम जागडे संघ व्यवस्थापक, पल्लवी मावळे सह व्यवस्थापक, तर संजय शिंदे यांची मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली आहे.