खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला मेढा पोलीसांना तात्काळ जेरबंद करण्यास यश आले आहे. या कारवाईबाबत मेढा पोलिसांवर सर्व स्तरावरून कौतुक होऊ लागले आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की दि.११/६/२०२५ रोजी रात्री. ०१.३० वा. चे सुमारास मौजे वाटंबे ता. जावली जि. सातारा गावचे हद्दीत सातारा ते महाबळेश्वर जाणारे रोडवर केळघर घाटामध्ये कोंबड्यांच्या व्यवसायाच्या कारणावरून सिकंदर इस्माईल मोमीन,मुसा इस्माईल मोमीन दोन्ही (रा.चाफळ ता.पाटण जि. सातारा) यांना विनोद रामचंद्र तुपे (रा. वडोली भिकेश्वर ता. कराड, जि. सातारा) व त्याचे साथीदारांनी क्रेटा गाडी मधून येवून त्यांना जिवे मारण्याचा कट करून त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांचेवर कोयत्याने वार करून तसेच लाकडी दांडक्याने व हाताने लाथाबुक्यांनी मारहाण करून त्यांचा जिव घेण्याच्या प्रयत्न केला.
मेढा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या तक्रारीवरून मेढा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १०७/२०२५ भारतीय न्याय. संहिता २०२३ चे कलम १०९, ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(२), ३(५), ६१(२), २४१ (क) प्रमाणे दि. ११/०६/२०२५ रोजी गुन्हा रजि. दाखल करणेत आलेला आहे.सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी घडलेल्या घटनेबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोशी,श्रीमती वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधीक्षक, बाळासाहेब भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांना तात्काळ माहीती दिली. त्यांनी दिले सुचनाप्रमाणे व मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणेचे खास पोलीस पथक तयार करून गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणेस सुरवात केली.
सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी विनोद रामचंद्र तुपे याचा शोध घेत असताना तो त्याचा मित्र प्रफुल्ल मोहन पटेल (रा. वाघेरी ता. कराड) याचे डोंगराचे कडेला असलेल्या शेतामधील पत्र्याचे शेडमध्ये लपून बसलेला असलेबाबत खात्रीशीर गोपनिय माहीती मिळाल्याने तात्काळ पोलीस ठाणेकडील खास पथक तयार करून त्यास पोलीस पथकाचे मार्फतीने शिताफीने ताब्यात घेतले.तसेच त्याचा साथीदार गुन्ह्यातील विधीसंघर्ष बालक हा सुद्धा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आलेले आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपी विनोद तुपे यास गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन गुन्ह्यामध्ये दि. १३/०६/२०२५ रोजी अटक करून त्यांची दि. १७/०६/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेणेत आलेली आहे. तसेच गुन्ह्यातील मुख्य आरोपीस सहकार्य करणारा आरोपी प्रफुल्ल मोहन पटेल यास नोटीस दिलेली असून विधीसंघर्ष बालक यास बाल न्याय मंडळ यांचे समक्ष हजर केले आहे. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि श्रीमती आश्विनी पाटील मेढा पोलीस स्टेशन ह्या करीत आहेत.
सदर कारवाई मध्ये मा. श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्रीमती वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधीक्षक, मा. बाळासाहेच भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मेढा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सुधीर पाटील सहा. पोलीस निरीक्षक, श्रीमती अश्विनी पाटील सहा. पो. निरीक्षक व पोलीस उप-निरीक्षक गंगावणे, पो.ना. बेसके च.नं. २६८४, पो.ना. रोकडे ब.नं.५०, पो.कॉ. काळे च.नं. २५२६, पो.कॉ. वाघमळे ब.नं.४८, पो.कॉ. वाघमळे ब.नं. १२२८, पो.कॉ.मोरे.ब.नं.१२६३, चालक पो.हवा. माळी ब.नं. १५५९, पो.नां. नष्टे ब.नं. १५५९, यांनी कारवाई मध्ये सहभाग घेतला आहे. मा. श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्रीमती वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधीक्षक मा. बाळासाहेब भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांनी सदर कारवाई मध्ये सहभागी अधिकारी, अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.