आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे जिमखाना विभाग व एनएसएस विभाग यांच्या वतीने नुकताच योगा दिन साजरा करण्यात आला. योगा दिनाला प्रमुख मार्गदर्शक मा.प्रकाश रावणंग, व सौ.राजश्री भोसले मॅडम कालिका देवी योगा ग्रुप सातारा यांनी आंतरराष्ट्रीय योगा प्रोटोकॉल नुसार योगाचे प्रात्यक्षिके करून घेतली तसेच ‘करो योग,रहो निरोग,हा संदेश देण्यात आला.आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद व विद्यार्थ्यांनी योगाचे प्रात्यक्षिक करून आपल्या आरोग्यासाठी योगा दररोज करण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी उपस्थित होते.त्यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,प्रत्येकाच्या आयुष्यात योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.तसेच योगा केल्यामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये सुख,शांती,कामांमधील शिस्त तसेच जीवन जगताना आपल्या अंतर्मनावर व बाह्यमानावर ताबा मिळविता येतो असा संदेश दिला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती डॉ. प्रमोद घाटगे यांची होती.त्यांनी आपल्या मनोगतात ‘आरोग्यम् धनसंपदा’ मिळवण्यासाठी योगाचे महत्व विशद केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमखाना विभाग प्रमुख प्रमोद चव्हाण यांनी केले.पाहुण्यांचा परिचय डॉ. सुधीर नगरकर यांनी केले व आभार प्रदर्शन एनएसएस विभाग प्रमुख डॉ.संजय धोंडे यांनी मानले.