• Latest

जावळी तालुक्यात ८०% पेरण्या झाल्याच नसल्याने ओला दुष्काळ जाहीर करा

July 3, 2025

जावली तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा:सुरेश पार्टे

July 3, 2025

प्रतिपंढरपुर करहरला जाणाऱ्या कुडाळ-पाचगणी रस्त्यात जागोजागी खड्डेच खड्डे 

July 3, 2025

जिल्ह्यातील महा-ई-सेवा केंद्राची दरमहा होणार तपासणी 

June 27, 2025

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात संपन्न

June 24, 2025

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला मेढा पोलिसांनी घेतले ताब्यात

June 17, 2025

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शिक्षण आनंददायी व्हायला हवे:संजय बैलकर

June 17, 2025

मेढा तहसील आवारातील बोगस महा ई सेवा केंद्र बंद करा:युवक अध्यक्ष सुहास चव्हाण

June 16, 2025
आधार केंद्राच्या नावाखाली महा ई सेवा केंद्राचे काम:जावली तालुक्यातील प्रताप

आधार केंद्राच्या नावाखाली महा ई सेवा केंद्राचे काम:जावली तालुक्यातील प्रताप

June 12, 2025

आधार केंद्राच्या नावाखाली महा ई सेवा केंद्राचे काम:जावली तालुक्यातील प्रताप

June 12, 2025

वीरेंद्र शिंदे यांची सातारा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (दिशा) कमिटीवर निवड

June 1, 2025

सांगवी रस्त्याच्या कामात ठेकेदाराला समाजकंटकाकडून आर्थिक मागणी? नागरिकांचा आरोप

May 14, 2025

सांगवी रस्त्याच्या कामात ठेकेदाराला समाजकंटकाकडून आर्थिक मागणी? नागरिकांचा आरोप

May 14, 2025
Thursday, July 3, 2025
  • Login
Prasanna Express
Advertisement
  • Home
  • प्रशासन
  • राजकीय
  • कला
  • देश
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Home
  • प्रशासन
  • राजकीय
  • कला
  • देश
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Prasanna Express
  • Login
  • Home
  • कला
  • क्रीडा
  • जिल्हा
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Home प्रशासन

जावळी तालुक्यात ८०% पेरण्या झाल्याच नसल्याने ओला दुष्काळ जाहीर करा

 "आम्ही जावळीकर" चळवळीची मागणी....

Prasanna Pawar by Prasanna Pawar
July 3, 2025
in प्रशासन
0
0
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जावली तालुक्यात मे महिन्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून,अद्यापही ८०% पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले असून, प्रशासनाने तात्काळ “ओला दुष्काळ” जाहीर करावा,अशी मागणी “आम्ही जावळीकर” चळवळीच्या वतीने मा.तहसिलदार जावळी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.सदर निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ.शिवेंद्रसिंह राजे भोसले,मा.जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनाही देण्यात आल्या आहेत.

जावळी तालुक्यात यंदा पावसाचे आगमन वेळेआधी मे महिन्याच्या मध्यंतरीच झाले.सलग पडणार्‍या पावसामुळे शेतीची मशागतही यावर्षी शेतकरीवर्गाला करता आलेली नाही.मशागतच झाली नसल्याने व सततच्या पावसाने थोडीही उसंत न घेतल्याने अद्यापही पेरण्या करता आलेल्या नाहीत.विशेषतः मोरावळे ते बोंडारवाडी,धनकवडी ते भामघर आणि कोयना व करहर विभागातील अनेक गावात यावर्षी कडधान्ये, भुईमूग, सोयाबीन आणि भात पिकांच्या पेरण्या झालेल्या नाहीत.शेतकर्‍यांनी भाताचे तरवे टाकले पण २०% शेतकर्‍यांची रोपे अल्प प्रमाणात उगवलीआहेत तर ८०% भाताचे बी कुजुन गेल्याने भात लावणी वाचून शेती पडून रहाणार असल्याने शेतकरी हवाल दिल झाले आहेत.अनेक शेतकर्‍यांनी बियाणे खरेदी व खते यांची खरेदी उसनवारी व उधारीवर केली पण पावसाने ती वाया गेली त्यामुळे शेतकर्‍यांच्या समोर अस्मानी संकट उभे राहिले आहे.

जावळी तालुक्याची भौगोलीक रचना पहाता महाबळेश्वरच्या जवळ असलेल्या डोंगर रांगातील या गावात नेहमीच पावसाचे प्रमाण अधिक असते.पण यावर्षी मात्र मे महिन्यापासून सलग पडणार्‍या पाऊसामुळे अद्यापही पेरण्या झाल्या नसल्याने या भागातील शेतकरी अडचणीत आला आहे.पूर आला,अतिवृष्टी झाली शेतीचे नुकसान झाले तर पंचनामे होतात.पण यावर्षी संततधार पाऊसामुळे पेरण्याच झालेल्या नाहीत त्यामुळे वरील निकष न पहाता मा.तहसिलदार सोा. यांनी महसुल विभागाच्या व कृषी विभागाच्या अधिकार्‍यांमार्फत या विभागील प्रत्येक गावातील शेतकर्‍याच्या बांधावर जावून प्रत्यक्ष स्थळपहाणी करून सरकारकडे याचा तातडीने अहवाल पाठवावा असे आवाहन प्रत्यक्ष भेटूनआम्ही जावळीकर चळवळीच्या माध्यमातून विलासबाबा जवळ,राजेंद्र जाधव, शांताराम कदम,सुरेश पार्टे,भास्कर धनावडे,मारूती चिकणे,सचिन करंजेकर, अरूण जवळ,प्रकाश सुतार,शंकर खामकर,सुरेश कदम,आनंदा परिहार,शरद देशमुख यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

सततच्या पावसाने यावर्षी पूर्ण खरीपाचा हंगामच वाया गेला असून कडधान्य सोयाबीन विकून शेतकरी वर्ग दिवाळीचा सण साजरा करीत असतो पण या वर्षी सरकारने मदत केली नाही तर शेतकर्‍यांना दिवाळी ऐवजी शिमगा करण्याची वेळ येणार असल्याने सरकारने गांभिर्यपूर्वक विचार करून शेतकर्‍यांना त्वरीत मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

ShareTweetSend
Prasanna Pawar

Prasanna Pawar

Related Posts

प्रशासन

जिल्ह्यातील महा-ई-सेवा केंद्राची दरमहा होणार तपासणी 

June 27, 2025
प्रशासन

आधार केंद्राच्या नावाखाली महा ई सेवा केंद्राचे काम:जावली तालुक्यातील प्रताप

June 12, 2025
प्रशासन

सांगवी रस्त्याच्या कामात ठेकेदाराला समाजकंटकाकडून आर्थिक मागणी? नागरिकांचा आरोप

May 14, 2025
प्रशासन

सांगवी रस्त्याच्या कामात ठेकेदाराला समाजकंटकाकडून आर्थिक मागणी? नागरिकांचा आरोप

May 14, 2025
प्रशासन

बेकायदेशीर उत्खननाची व सांगवी रस्त्याची मुरूम रॉयल्टीची चौकशी करून कारवाई करा

May 12, 2025
प्रशासन

बेकायदेशीर उत्खननाची व सांगवी रस्त्याची मुरूम रॉयल्टीची चौकशी करून कारवाई करा

May 12, 2025
प्रशासन

ग्राहकच आपले दैवत असून त्यांचे समाधान होईल असे काम करावे:- बाळासाहेब हळनोर

April 10, 2025
प्रशासन

अविनाश कचरे यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेत “कार्यकारी सहाय्यक” पदी निवड

April 10, 2025

Recent Posts

  • जावळी तालुक्यात ८०% पेरण्या झाल्याच नसल्याने ओला दुष्काळ जाहीर करा
  • जावली तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा:सुरेश पार्टे
  • प्रतिपंढरपुर करहरला जाणाऱ्या कुडाळ-पाचगणी रस्त्यात जागोजागी खड्डेच खड्डे 
  • जिल्ह्यातील महा-ई-सेवा केंद्राची दरमहा होणार तपासणी 
  • आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात संपन्न

Recent Comments

No comments to show.
  • Home
  • प्रशासन
  • राजकीय
  • कला
  • देश
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2024 Prasanna Express

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • कला
  • क्रीडा
  • जिल्हा
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2024 Prasanna Express