जावली तालुका हा दुर्गम भाग असून तालुक्याच्या ठिकाणी गाव स्तरावरून विद्यार्थी-विद्यार्थिनी,जेष्ठ नागरिक विविध दाखले काढण्यासाठी ये-जा करत असतात.त्यातच जावली तालुक्यामध्ये मेढा,कुडाळ,करहर या विभागात एकूण अधिकृत ई सेवा केंद्र किती आहेत? याचा खुलासा करावा.तसेच तहसील आवाराच्या कार्यालयासमोर श्री पंडित नामक यांचे आधार केंद्राच्या नावाखाली महा-ई-सेवा केंद्र सुरू आहे परंतु सुरू असलेले महा-ई-सेवा केंद्र हे करहर या ठिकाणी असणे अपेक्षित असतानाही मेढा या ठिकाणी कोणाच्या वरदहस्तामुळे मेढा या ठिकाणी सुरू आहे.याची सखोल चौकशी करावी अशी मागणी युवक अध्यक्ष सुहास चव्हाण यांनी जावली तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मात्र नावापुरते सुरू असलेले आधार केंद्राचे आयडी ब्लॉक झाल्याचे समजते तशी चर्चा मेढा मध्ये सुरू आहे.तरी याच ठिकाणी आधार केंद्राची कामे कमी पण डोमासाईल,नॅशनॅलिटी,उत्पन्नाचा, जातीचा दाखला,कास्ट व्हॅलेडीटी व इतर दाखले राजरोसपणे बेकायदेशीरित्या सुरू आहेत.तरी सदर ई सेवा केंद्रची मान्यता ? व सदर ई सेवा केंद्र हे अधिकृत आहे का? याचा खुलासा करून नागरिकांकडून व विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त 400, 500,200, अशी रक्कम घेऊन कोणत्याही पद्धतीची पावती न देता बोगस सेवा केंद्र सुरू असून त्यामध्ये अधिकृत दाखले मिळतात हाच संशोधनाचा मुद्दा आहे.दाखले व आफिडेविटच्या गोंडस नावाखाली 200 ते 300 रुपये आकारले जातात.मात्र सदर ई सेवा केंद्राला कोणतीही अधिकृत परवानगी नसून ग्राहकांची अतिरिक्त आर्थिक लूट करणाऱ्या श्री पंडित यांच्यावर कारवाई करावी.
तसेच या अगोदर पुरवठा विभागामध्ये ऑनलाईन कामासाठी शंभर रुपये घेतले जात होते.मात्र काही तांत्रिक बाबीमुळे सदरचे काम बंद करून त्याच महिलेने बाहेर दोनशे रुपये घेऊन ऑनलाईन काम करण्याचा गोरस धंदा चालू केला आहे.मात्र अनेक लोकांची कामे प्रलंबित असून पैसे घेऊन सदर महिला या ठिकाणी उपलब्ध नसल्याने अनेक नागरिकांची फसवणूक झालेली आहे.तरी त्या महिलेची चौकशी करून इथून पुढे पुरवठा विभागाची कामे शासनाच्या कार्यालयामध्ये मोफत करून नागरिकांचा त्रास कमी करावा व तात्काळ पुरवठा विभागाचा कारभार सुधारावा.तसेच तहसील कार्यालय आवारातील सदर बोगस ई सेवा केंद्र बंद करावे.तसेच घोटेघर ता.जावलीमध्ये एका धन दांडग्याकडून बेकायदेशीर व अनधिकृत रित्या उत्खनन झालेले असून सदर उत्खननामुळे भविष्यकाळात डोंगरामधील माती भुसभुशीत होऊन भूस्खलन झाल्यास याला जबाबदार कोण?तरी सदर अनधिकृत उत्खनन करणाऱ्या धन दांडग्यावर कारवाई करावी.
या तिन्ही मागण्याचा विचार सकारात्मक व्हावा ही अपेक्षा असे न झाल्यास लोकशाही मार्गाने तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष आयु. किरण दादा बगाडे यांच्या आदेशाने तहसील कार्यालयासमोर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने एक दिवशीय तीव्र निदर्शने करण्यात येणार असल्याचे जावली युवक अध्यक्ष सुहास चव्हाण यांनी सांगितले आहे.