महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आयु.संजय (भैय्या)सोनवणे यांच्या आदेशाने महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची संघटन संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असताना आज सातारा जिल्ह्यामध्ये युवकांनी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संघटन वाढवण्याची धुरा खांद्यावर घेतली आहे.यातच आज मेढा जावली मधील नवनियुक्त कार्यकारणीची बैठक शासकीय विश्रामगृह मेढा या ठिकाणी सातारा जिल्हाध्यक्ष किरण बगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी किरण बगाडे म्हणाले की शोषित,पीडित,वंचित घटकांसाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष सदैव आपल्या पाठीशी उभा राहणार आहे.प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी पद घेऊन शोषित,पीडित वंचितांच्या न्याय हक्कासाठी लढणे ही काळाची गरज आहे.
यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या जावली तालुका अध्यक्षपदी प्रशांत तांबे तर युवक अध्यक्षपदी सुनील गायकवाड व तालुका युवक उपाध्यक्षपदी सुरज भिसे यांना जिल्हाध्यक्ष किरण बगाडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष किरण बगाडे,जिल्हा युवक अध्यक्ष सोमनाथ भाऊ धोत्रे,योगेश माने,राजू भिसे,सयाजी भिसे,शंकर भिसे, अमोल खुडे,सदाशिव भिसे,आदिनाथ गंगावणे,अतुल भिसे,महेश गायकवाड,महाबळेश्वर तालुका अध्यक्ष सुनील कदम, उपाध्यक्ष अरविंद घाडगे व इतर असंख्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.