ग्राहकच आपले दैवत असून त्यांचे समाधान होईल असे काम करणे ही आपली जबाबदारी आहे.तसेच महावितरण मेढा उपविभागाने सुरुवातीपासूनच वीजबिल वसुलीत सातत्य ठेवल्याने विजबिलांची उच्चांकी वसुली झाली आहे.असे प्रतिपादन महावितरण सातारा मंडलाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर यांनी केले. मेढ्यात वीजकर्मचाऱ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते.याप्रसंगी वाई विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल शिवतारे,अतिरिक्त कार्यकारी अभियंता सौ.रुपाली चित्तावार, सांगली प्रशिक्षण केंद्राचे अभियंता श्री.वायदांडे,वाईचे उपकार्यकारी अभियंता गणेश कोंदे,भाग्यश्री ढाके,मेढ्याचे उपकार्यकारी अभियंता सुरेंद्र भूतकर,पाचगणीचे गणेश भोसले,तसेच वाई विभागाचे उपव्यवस्थापक विजय चौगुले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
दरम्यान यावेळी पुढे बोलताना बाळासाहेब हळनोर म्हणाले की,मेढा उपविभागाच्या कार्यक्षेत्राची भौगोलिक परिस्थिती ही खडतर असून सुद्धा या उपविभागतील अधिकारी यांनी सर्वच बाबतीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.उपविभागाच्या थकीत विजबिलांच्या वसुलीबाबत काटेकोरपणे नियोजनामुळे वीजबिल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.वीजग्राहकांना सेवा देताना सर्वांनी प्रामाणिकपणे काम करत ग्राहकांचे तसेच काम करून स्वतःचेही समाधान होईल असे काम करावे असे सांगितले. वीजकर्मचाऱ्यांनी अपघात घडू नयेत यासाठी काम करताना पूर्ण सुरक्षितता बाळगून काम करावे अशा सूचना यावेळी केल्या.
दरम्यान यावेळी झालेल्या कार्यक्रमात वाई विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल शिवतारे यांनी बोलताना वीजबिल वसुली उद्दिष्टपूर्तीबद्दल मेढा उपविभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले तसेच पुढील काळात वाई विभाग यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी अधीक्षक अभियंता यांना दिली.
यावेळी विजकर्मचाऱ्यांसाठी विद्युत सुरक्षितता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित सर्व वीजकर्मचाऱ्यांचा सत्कार पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. या कार्यक्रमात शाखा अभियंता सुरेश कुंभार, हर्षल शिंदे,विश्वनाथ डिगे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश जाधव यांनी तर सूत्रसंचालन उदय देशमाने यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इम्रान जमादार,प्रणित कांबळे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी कष्ट घेतले.