खंडेराव पाटील
कोतोली पैकी माळवाडी (ता. पन्हाळा) येथील प्राथमिक शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना फ्रेंडशिप ग्रुप संचलित अंकुर फौंडेशन, कोतोली यांच्या मार्फत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये स्कुलबँग, वह्या, पेन इत्यादी शैक्षणिक साहित्याचा समावेश होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच सागर बाबुराव पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक प्रभाकर पाटील होते. यावेळी अंकुर फौंडेशनचे अध्यक्ष संग्राम पाटील यांनी फौंडेशनच्या कार्याची माहिती दिली.
माजी उपसरपंच संतोष खोत यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला अंकुर फौंडेशनचे सदस्य महादेव चौगले, दत्तात्रय चौगले, जगनाथ गायकवाड, सागर गायकवाड, बाळासो गायकवाड, संजय मुगडे, विक्रम पाटील, संतोष संकपाळ, जयदीप पाटील, दिपक पोवार, माळवाडी गावचे जेष्ठ नागरिक यशवंत गायकवाड यांच्यासह शाळेचे शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन के. वाय. पाटील यांनी केले तर आभार विकास कांबळे यांनी मानले.