शहाबाज मुजावर.
हारूणशेठ इलेव्हन संघाला उपविजेतेपद तर आमदार इलेव्हन संघ ठरला तृतीय क्रमांकाचा मानकरी दिनांक १२ मार्च २०२३ पन्हाळ्यातील स्थानिक क्रिकेटला एक चालना मिळावी युवा खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळावा या प्रमुख उद्देशाने आयोजित पन्हाळा प्रिमियर लिग या भव्य टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा पन्हाळा येथील खोकड तलाव मैदानावर पार पडल्या. पन्हाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. चेतनकुमार माळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. धनंजय भोसले व मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
दोन दिवसात पार पडलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन पन्हाळा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक गिरी मॅडम, आयोजन समितीचे आधारस्तंभ श्री. रविंद्र तोरसे, रविंद्र धडेल, अवधूत भोसले, अभिजीत फणसळकर, सुभाष गवळी, मारुती माने, राजू आगा, तौफिक मुजावर, साहिल पोवार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
आयपीएलच्या धर्तीवर आधारित लिलाव पद्धतीने राजधानी स्पोर्ट्स, जी.पी. वारियर्स , कॉलिटी वारियर्स, हारूणशेठ इलेव्हन व आमदार इलेव्हन असे ५ संघ तयार करण्यात आले होते. या संघांचे संघमालक अनुक्रमे श्री रवींद्र धडेल, श्री गणेश पवार, श्री अवधूत भोसले, श्री तौफिक मुजावर व श्री नंदकुमार कांबळे असे होते. प्रत्येक खेळाडूला आयोजन समितीमार्फत टी-शर्ट देण्यात आले होते.
शेतकरी वस्त्र भांडार बांबवडेचे श्री रविंद्र खुटाळे, शाहू चित्रमंदिर कोल्हापूरचे श्री विक्रम भोसले व श्री हर्षद बच्चे हे स्पर्धेचे सहप्रायोजक होते. प्रथम क्रमांकसाठी रुपये ११,१११ श्री भूषण औंधकर यांचेकडून, द्वितीय क्रमांकासाठी रुपये ९,१११ श्री सचिन पाटील यांचेकडून तर तृतीय क्रमांकासाठी रुपये ७,१११ श्री संदीप पाटील यांचेकडून देण्यात आले. सर्व ट्रॉफीज व मेडल्स श्री अमरसिंह भोसले यांचेकडून तसेच वैयक्तिक बक्षिसे श्री शोएब आगा यांचेकडून देण्यात आलीत. प्रत्येक सामन्याच्या सामनावीरसाठी यशराज ऑप्टिक्स बांबवडे यांचेकडून गॉगल्स देण्यात आलेत.
या स्पर्धेतील मालिकावीर व उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब बहुमान ओंकार पाटील यास मिळाला. तर उत्कृष्ट फलंदाजाचा किताब महेश कांबळेने पटकावला. अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून प्रविण मिटके यास सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धा पार पाडण्यासाठी अमितराज पवार, अमितकुमार दळवी, चेतन राऊत, प्रदीप राऊत, प्रवीण मिटके, आशिष घाडगे, भूषण औंधकर, सौरभ तोरसे, अन्सार मुजावर, पृथ्वीराज भोसले, दगडू पोवार, दिगंबर गवळी व सुशांत माणगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले. तर सूत्रसंचालन व समालोचनाचे काम आशिष उदाळे व श्री दिलीप दळवी यांनी पार पाडले.
आयोजन समितीस विजय पाटील, जीवन पाटील, सतीश भोसले, बाळकृष्ण भोसले, संजय गुरव, स्वप्निल काशीद, अंशुमन गायकवाड, संदीप लोटलीकर व हॉटेल मृणाल या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.