ओंकार साखरे
निर्मल ग्रामपंचायत मामुर्डी चे कर्मचारी नाथमहाराज ज्ञानदेव धनावडे उर्फ आबा यांचे अल्पशः आजाराने गुरुवारी रात्री वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले अत्यंत हालाखीची परिस्थीती असलेने, शारीरीक दृष्टया कमजोर असलेले नाथमहाराज नावाप्रमाणे नाथ होते गेली २५ वर्ष इमानदारी ने ग्रामस्थांची सेवा केली ग्रामपंचायतीची वसुली सुद्धा इमानदारीने करीत असत नाथमहाराज आई – वडीलां विना पोरके होते काही वर्षापूवी पत्नी निता हि सुद्धा अर्धावर संसार सोडून देवाघरी गेली आबांना त्यांचे हाबाजी चे घरातील सर्वांचे, तसेच ग्रामस्थांचे सहकार्य लाभले मुळे आबांना एकटे असलेची जाणीव कधीच झाली नाही बोंडारवाडी कृती समितीच्या सक्रीय सदस्या कविता ओंबळे या आबांच्या लहान बहिण आहेत कविताताई वयाने लहान असुन त्यांनी आई सारखी भावाची खुप सेवा केली आबांना एक मुलगा व एक मुलगी आहे मुलगी तनुजा दहावीत शिकत आहे मुलगा सातवीत आहे. सद्या दहावीची परिक्षा सुरु आहे शुक्रवारी तनुजाने केळघर येथे जावून दहावीचा पेपर दिला त्यानंतर वडिलांचे शेवटचे सर्व विधी पार पाडून अंत्यदर्शन घेवून दोन्ही बहीन भावांनी वडीलांना मुखाग्नी दिला त्यावेळी हजर असणारे सर्वांचे डोळे पाण्याने पानावले होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी एकनाथ ओंबळे, सरपंच परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष बजरंग चौधरी अजय धनावडे अंकुश सपकाळ गुरुजी यांनी आबांविषयी भावना व्यक्त करून सर्वांनी भावपूर्ण श्रदांजली वाहीली अंत्यविधीसाठी आनंदराव जुनघरे, शांताराम कदम, शांताराम पार्टे, तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, सांप्रदायीक क्षेत्रातील तसेच विविध गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.