मेढा / प्रतिनिधी
गुणवत्त्येच्या आकडयात अडकण्याची गरज नसून आपल्यावर काय संस्कार आहेत हे महत्वाचे आहे. पैशाने सर्व काही विकत घेता येते पण संस्कार विकत घेता येत नाहीत. आई , वडील, गुरुजन व समाज यांच्याकडूनच आपल्याला संस्कार मिळतात. सुसंस्कृत पिढी घडवणे काळाची गरज आहे. असे आवाहन प्राचार्य डॉ मेजर अशोक गिरी यांनी केले.
महात्मा गांधी वायनालयाचे वतीने आयोजीत केलेल्या विविध पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी बोलत होते. याप्रसंगी जेष्ठ व्याख्याते श्रीधर साळूंखे, बबनराव वारागडे, प्रा . तुकाराम ओंबळे, सुर्यकांत देशमुख , एकनाथ ओंबळे, सुमती पंडितराव (काकी ), शिवव्याख्याती कु. साहिली भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थीत मान्यवरांचे हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये वाचनालयाचे वतीने दिला जाणारा या वर्षीचा मानाचा ” जीवन गौरव पुरस्कार ” साहेबराव साळूंखे ( गुरूजी) यांना प्रदान करण्यात आला.आदर्श शिक्षिका स्व. सौ. मंदाकिनी तुकाराम ओंबळे यांचे स्मरणार्थ आदर्श सामाजिक कार्यकर्ते पुरस्कार . बोंडारवाडी धरणग्रस्त कृती समितीचे समन्वयक स्व. विजयराव मोकाशी यांना मरणोत्तर देण्यात आला.तर आदर्श सामाजिक कार्यकर्ती कविता शांताराम धनावडे यांना, तसेच
जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार मुक्ता धनावडे यांना देण्यात आला.वाचनालयाचे वतीने दिला जाणारा डॉ.एस.आर. रंगनाथन जिल्हास्तरीय ” आदर्श ग्रंथपाल ” श्रीमती कुमुदिनी फाळके – ग्रंथपाल नवयुग वाचनालय निनाम पाडळी. ता. जि. सातारा यांना तसेच कै. शामराव बापुराव क्षिरसागर ( गुरुजी) “जिल्हास्तरीय आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार “रविंद्र झुटिंग – अश्वमेघ वाचनालय सातारा यांना , स्व. जनाबाई मारूती पार्टे ” आदर्श माता पुरस्कार” सौ . रजिया मुबारक शेख रा. मेढा यांना तर स्व. सावित्री सिताराम थत्ते ” आदर्श महिला वाचक पुरस्कार ” सौ . शिल्पा शरद गांधी, सौ . कल्याणी अतुल इगावे, सौ . रेश्मा भाऊसाहेब बेलोटे यांना वितरीत करण्यात आला..