ओंकार साखरे
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मौजे असनी आणि केळघर या ठिकाणी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या आमदार फंडातून मंजूर असणाऱ्या कामांचा भूमिपूजन सोहळा जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या हस्ते संपन्न झाला.
आसनी येथे जनसुविधा योजनेतून ग्रामपंचायत कार्यालय 12लाख,
आमदार फंडातून मंदिर परिसर सुशोभीकरण करणे 10लाख,
केळघर येथे बंदिस्त गटर 10लाख रुपये या कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
यावेळी बोलत असताना जावली तालुक्याचे लोकप्रिय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून जावली तालुक्यात प्रत्येक गावात वाडी वस्तीत विकासाची गंगा पोहोचवत तालुक्यातील सर्व गावे सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू असून प्रत्येक गावात कोट्यवधी रुपयाच्या फंड उपलब्ध असून प्रत्येक गावात विकास काम सुरू आहेत.सध्या राज्यात असलेले शिंदे फडणवीस यांचे सरकारच्या माध्यमातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावली तालुक्यासाठी प्रचंड असा निधी उपलब्ध करून दिला आहे.प्रत्येक गावात मूलभूत सुविधा पोचवण्याचे काम आमदार साहेबांच्या माध्यमातून होत आहे. येत्या आठवड्यात केडंबे विभागाला जोडणारा नांदगने पूनवडी पूलाचा भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे त्याच दिवशी आंबेघर ते बोंडारवाडी रस्ता,असनी ते म्हाते रस्ता,केळघर ते गढवली रस्ता अशा विविध कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थित होणार असल्याचे यावेळी बोलताना ज्ञानदेव रांजणे यांनी सांगितले. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे अर्थ आणि जलसंपदा खाते असल्याने बोंडारवाडी धरणाचा मार्ग देखील सुकर होणार आहे. लवकरच बोंडारवाडी धरण संदर्भात मागील आठवड्यात मंत्रालयात झालेले मिटींगची माहिती प्राप्त झाले बरोबर सर्वे साठी 80 लाखाचा निधी उपलब्ध होणार असल्याचे यावेळी सांगितले.ज्ञानदेव रांजणे,सागर धनावडे,मोहन कासूर्डे,हरिभाऊ शेलार,
,नाना जांभळे,बबन बेलोशे,भाऊ जाधव,आसनी आणि केळघरचे ग्रामस्थ उपस्थित होते.