सध्या संपूर्ण राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे.महाराष्ट्रातील असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील दोन मतदारसंघांवर प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाचे लक्ष कायम लागून राहते ते दोन विधानसभा मतदारसंघ म्हणजे कोरेगाव आणि सातारा.सध्या सातारा-जावली मतदारसंघात मेढा येथे एका नवीन *भावी आमदार* यांचे भव्य अशा 29 ऑगस्टच्या दहीहंडी निमित्त बॅनर झळकू लागले आहेत.त्यामुळे सर्वत्रच *भावी आमदार* या अशयाचा असणारा बॅनर चर्चचा विषय होऊ लागला आहे.
गत पंचवार्षिकला कोरेगाव विधानसभा मतदारसंघात झालेला फेरबदल असाच फेरबदल यावेळेस सातारा-जावली मतदार संघामध्ये होणार का अशा विविध चर्चांना उद्यान येऊ लागले आहे. तसेच सलग तीन वेळा विद्यमान आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जावलीचे नेतृत्व केले आहे.विद्यमान आमदारांनी जावलीमध्ये भरघोस अशी विविध विकास कामे मंजूर करून पूर्णत्वास नेली आहेत.परंतु या विधानसभेला विद्यमान आमदारांना तुल्यबळ असा प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीतून कोण दिला जाणार अशी चर्चा सुरू आहे.यातच मेढामध्ये दहीहंडी निमित्त अंकुश (बाबा)कदम यांचे *भावी आमदार* अश्या आशयाचे बॅनर झळकल्याने वेगळीच चर्चा रंगू लागली आहे.
मेढ्यामध्ये प्रथमतःच सर्वात मोठी जावलीच्या स्वाभिमानाची दहीहंडी भरवली जात आहे.त्यामुळे या बॅनरजी चर्चा संपूर्ण तालुक्यासह जिल्हात होऊ लागली आहे. तसेच जावलीतील जनता या नवीन भूमिपुत्राच्या पाठीशी ठाम उभी राहून *भावी आमदाराला* आमदार करणार का असा सवाल जनतेमधून उपस्थित केला जाऊ लागला आहे.यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांची भूमिका काय असणार हा येता काळच ठरवणार हे मात्र नक्की आहे.
जावली तालुक्यातील माजी आमदार सदाभाऊ सपकाळ व अमित (दादा) कदम (माजी अर्थ व शिक्षण सभापती जि.प.सातारा यांची काय भूमिका असणार याकडे तमाम जावलीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.सध्या राजकारणात काहीही घडू शकते अशी परिस्थिती आहे.नुकतेच अमीत(दादा) कदम यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर संधी मिळावी अशी कार्यकर्त्यांकडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित (दादा)पवार यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.तसेच राजकीय परिस्थिती पाहून जनतेने ठरवल्यास येती विधानसभा लढविण्याच्या तयारीत आहे असेही मत अमित (दादा) कदम यांनी यापूर्वीच व्यक्त केले आहे.
तसेच तालुक्यातील खा.शरद पवार गटाचे विधानसभेचे उमेदवार असणारे दीपक (बापू)पवार यांची भूमिका नेमकी काय असणार हेही पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे.या विधानसभेला सातारा-जावलीतून महाविकास आघाडीची उमेदवारी दीपक (बापू)पवार यांना मिळणार की नवीन चेहरा दिला जाणार याबाबत विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.त्यामुळे येत्या विधानसभेला सातारा-जावलीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला लागली आहे.तसेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे या विधानसभेच्या निवडणुकीत काय रणनीती आखणार याकडे तमाम जावलीकरांचे लक्ष लागले आहे.तसेच अंकुश (बाबा)कदम युवा फाउंडेशन यांचे पदाधिकारी,कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.सध्या जावलीत होत असणारी ” *भावी आमदार* ” अशी बॅनरबाजी नेमकी जावलीच्या राजकारणावर काय परिणाम करणार हे येणारा काळच ठरवणार आहे.