जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या शासकीय योजना सर्व सामान्य जनते पर्यंत आपल्या लेखणी द्वारे जावली तालुक्यात पोहोचविण्याचे काम यशस्वीपणे केल्याबद्दल जावली पंचायत समितीच्या वतीने जावली तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष व दैनिक सकाळचे प्रतिनिधी मा.प्रशांत गुजर यांना सन 2023-24 यावर्षीचा विशेष पुरस्कार आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे हस्ते यशवंतराव चव्हाण बहुदेशीय सभागृहात शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात सन्मानीत करण्यात येणार आहे.पत्रकार प्रशांत गुजर यांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,क्रीडा,पत्रकारिता क्षेत्रासह सर्व स्तरातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.