प्रतिनिधी:संजय वांगडे.
प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कार्यरत असणाऱ्या गटप्रवर्तक सौ अर्चना चिकणे यांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.करंडी/ कुसंबी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा. प्रा.आ.केंद्र. कुसंबी च्या गटप्रवर्तक,कुसुंबी गावच्या सुवासिनी. सौ.अर्चना ज्ञानदेव शेलार (चिकणे) यांची राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविणे या योजेणे अंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या शासकीय योजना सर्व सामान्य जनतेपर्यंत आपल्या कामा द्वारे जावली तालुक्यात कुसुंबी गटाचे काम गटप्रवर्तक यशस्वीपणे केल्याबद्दल जावली पंचायत समितीच्या वतीने. गटप्रवर्तक, सौ.अर्चना ज्ञानदेव शेलार (चिकणे) यांचा सन 2023-24 यावर्षीचा विशेष पुरस्कार आमदार. श्रीमंत. छत्रपती. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे हस्ते यशवंतराव चव्हाण बहुदेशीय सभागृहात शुक्रवार.दि. 23 ऑगस्ट रोजी दुपारी. 2 .वाजता होणाऱ्या कार्यक्रमात सन्मानीत करण्यात येणार आहे. गटप्रवर्तक. सौ.अर्चना ज्ञानदेव शेलार(चिकणे) यांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा,वैद्यकीय, क्षेत्रासह तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुर जगदाळे डॉ. स्नेहल थोरात,सरपंच मारुती चिकने, पोलीस पाटील एकनाथ सुतार तसेच सर्व कर्मचारी वर्गाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रामाणिकपणे काम केल्यावर नक्कीच त्याची पोच पावती मिळते असे जनसामान्यांचे मत आहे.