सध्या संपूर्ण राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.यात जावली तालुक्यात दहीहंडीच्या उत्सवापासून चांगलीच राजकीय बॅनरबाजी होऊ लागली आहे.तालुक्यातील कुडाळ,मेढा व इतर भागात *एक सामान्य जावलीकर* अश्या आशयाचा बॅनर झळकत आहेत. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अंकुश (बाबा)कदम यांनी जावली तालुक्यातील आरोग्य यंत्रणा, नोकरीसाठी जावलीतील तरुणांची होत असलेली फरफड तसेच जावलीतील विकासाला चालना मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते.तसेच मेढा येथे झालेल्या जनसंवाद मेळाव्यामध्ये अमित (दादा)कदम यांनीही जावलीतील विकास कामांचा आढावा घेत जावलीच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे मत व्यक्त केले असून येणारी विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणारच असाही नारा दिला होता.मेढा नगरीतील असणारे एस.एस.पार्टे गुरुजी हे ही या विधानसभा निवडणुक लढवणार असल्याचे बोलले जात आहे.यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत चांगलीच रंगतदार येणार यात तीळमात्र शंका नाही.
आजपर्यंत आमदार शशिकांत शिंदे यांनी जावलीच्या विकास कामांमध्ये मोलाचे योगदान दिले असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.परंतु सद्यस्थितीत आमदार शशिकांत शिंदे जावली तालुक्यातून विधानसभा लढवणार की कोरेगाव विधानसभा लढवणार याकडे तमाम जावली करांचे लक्ष लागून राहिले आहे. आ.शशिकांत शिंदे यांनी स्वगृही परतावे आणि जावलीच्या विकासासाठी सातारा-जावली विधानसभा लढवावी अशी मागणी सध्या जावलीतील जनतेकडून होऊ लागली आहे.सलग तीन टर्म सातारा-जावलीचे आमदार असलेले आ.श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावलीच्या विकासासाठी गेले पंधरा वर्षे भरीव असे योगदान दिले आहे.जावलीच्या विकासासाठी विद्यमान आमदारांनी आज पर्यंत चांगलीच मेहनत घेतल्याचे दिसत असले तरी *एक सामान्य जावली कर* अश्या आशयाखाली लावण्यात आलेल्या बॅनरमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ लागला आहे.त्यामुळे येणाऱ्या सातारा-जावली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भावी आमदारांची वाढती संख्या पाहता ही निवडणूक नक्की कोणाला जड जाणार हा काळच ठरवणार आहे.
गणेशोत्सव कालावधीमध्ये आमदार बाबाराजे यांनी विविध मंडळांना भेट देत आपला असणारा जनसंपर्क हा आजही अबाधित असल्याची जाणीव विरोधकांना करून दिली आहे.तसेच जावली तालुक्यातील मुनावळे सारख्या पर्यटन विकासाला विद्यमान आमदारांनी भरीव असा निधी मंजूर करून घेतला असून अनेक भागातील अंतर्गत रस्ते व विविध विकास कामे बाबाराजेंच्या नेतृत्वात पूर्ण होत असल्याचेही जनतेमधून बोलले जात आहे.
माजी आमदार सदाभाऊ सपकाळ व माजी जि.प.सदस्य दीपक (बापू) पवार यांनी देखील जावलीच्या विकासासाठी योगदान दिले असल्याचे विसरून चालणार नाही.
परंतु सातारा जावलीच्या विधानसभेच्या निवडणुकीत भावी आमदार,माजी आमदार व विद्यमान आमदार यांच्यात जोरदार फाईट होणार याची तयारीच जणू सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.जावली तालुक्यातील मेढा भागामध्ये एमआयडीसी करण्यासाठी जागा काही वर्षांपूर्वीच मंजूर करण्यात आली असल्याची चर्चा जनतेमध्ये होऊ लागली आहे.जर एमआयडीसी साठी जागा असेल तर तरुण-तरुणींच्या हाताला काम मिळण्यासाठी तत्परतेने जावली तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन एमआयडीसी उभारण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी युवा वर्गातून होऊ लागली आहे.
गेल्या पंधरा ते वीस वर्षात प्रथमताच जावलीत बॅनरबाजी वार पाहायला मिळत आहे.त्यामुळे हे बॅनर टाकण्यामागील नक्की हेतू काय असावा असा प्रश्न सध्या जावलीकारांना पडू लागला आहे.अजित(दादा) गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित (दादा)कदम यांनी नुकतीच सातारा शासकीय विश्रामगृहामध्ये खा.शरद पवार यांची भेट घेतली असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी अमित दादा यांना सातारा-जावळी विधानसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी केली आहे.त्यामुळे खा.शरद पवार गट यांच्याकडून सातारा-जावली विधानसभेचे उमेदवारी माजी जि.प.सदस्य दीपक (बापू) पवार,अमित (दादा) कदम की खासदार शरद पवार यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळख असणारे आमदार शशिकांत शिंदे यांना भेटणार हा येता काळच ठरवेल.तसेच अंकुश (बाबा) कदम यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेमुळेच तर हे *एक सामान्य जावलीकर* अशा आशयाचे बॅनर टाकले गेले आहेत की काय अशी जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
…या पदाधिकाऱ्यांवर असणार सातारा-जावळी विधानसभेची जबाबदारी
वसंतराव मानकुंबरे,सुहास (दादा) गिरी,ज्ञानदेव रांजणे,सौरभ शिंदे,दत्ता गावडे,वीरेंद्र शिंदे,हेमंत शिंदे,जयदीप शिंदे,रवी परामणे,जयश्री ताई गिरी,अरुणा शिर्के, साधू चिकणे,राहुल ननावरे,अतिश कदम,सचिन (भाई) शिंदे,सोमनाथ कदम,आशिष रासकर,किरण बगाडे,पंजाबराव जाधव,सचिन जवळ,सचिन करंजेकर, आदी पदाधिकाऱ्यांवर असणार आहे.