करहर पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना सूचित करणेत येते की, महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे उद्या दि 20.2.2025 रोजी मौजे करहर येथे सकाळी 10.30 वाजता जननी माता मंदिरामध्ये आयोजन करणेत आले आहे.
या कार्यक्रमांतर्गत तहसिल कार्यालय,पंचायत समिती,कृषी विभाग,भूमी अभिलेख आदी विभागांतर्गत येणाऱ्या सर्व सरकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्यामध्ये उत्पन्नाचा दाखला,जातीचा दाखला,नॉन क्रिमीलेयर दाखला,शिधापत्रिका,मतदार यादीमध्ये नाव नोंदवणे,आधार नोंदणी व दुरुस्ती,ॲग्री स्टॅक योजना विवाह नोंदणी,जन्म मृत्यू प्रमाणपत्र,कृषी विभागांतर्गत येणाऱ्या सर्व योजना इत्यादी सरकारी योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.तरी सर्व ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती जावलीचे तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी केली आहे.