सातारा:अजित जगताप
महाराष्ट्र राज्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर हे जागतिक पर्यटन स्थळ आहे.परंतु त्याची खरी ओळख शेतकऱ्यांच्या घामातून उत्पादन केलेल्या स्ट्रॉबेरीमुळे जगप्रसिद्ध झालेली आहे.सध्या महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी भारतातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय आहे. पण,या स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी दुर्लक्षित असल्याची खंत लिंगमळा शेतकरी सामाजिक संस्था लिंगमळा ता महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी व महाबळेश्वरचे माजी सभापती विजयकुमार भिलारे यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना निवेदन दिले आहे.देशाच्या स्वातंत्र्य काळापासून महाबळेश्वर येथील लिंग मळा तसेच इतर भागांमध्ये स्ट्रॉबेरी उत्पादन केले जात होते.त्यावेळेला प्रसारमाध्यम व सोशल मीडिया नसल्याने त्याला फारशी प्रसिद्धी मिळाली नव्हती. अलीकडच्या काळामध्ये गाव तेथे शिवार,,,शिवार तेथे स्ट्रॉबेरी,,,अशा पद्धतीने सर्वत्र स्ट्रॉबेरी उत्पादन केले जात आहे.असे असताना महाराष्ट्र शासनाच्या काही स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी अहवाल केला आहे.शेतकऱ्याची संपर्क न सांगता एका ठराविक शेतकऱ्यांच्या हितासाठी गुरेघर हे गाव स्ट्रॉबेरी पिकवणारे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे.असा समज काही आजूबाजूच्या गावातील स्ट्रॉबेरी उत्पादक यांचा झाला आहे.खरं म्हणजे गुरेघर या ठिकाणी शेतकरी वर्ग स्ट्रॉबेरी पीक उत्पादन घेत आहेत.परंतु त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात इतर गावांमध्येही स्ट्रॉबेरी उत्पादन केले जाते.
पर्यटकांनी अनेकदा महाबळेश्वर तालुक्यातील आवकाळी,नाकीदा,मेटगुताड,लिंगमळा ,भोसे,भिलार,खिंगर,अमराळे,गोढ वली,दांडेकर,माचूतर, तापोळा,प्रतापगड,पार,जावळी,हरोशी,दरे,महाबळेश्वर तालुक्यातील परिसरात जाऊन स्ट्रॉबेरीच्या ऑस्ट्रेलिया, बेंगलोर,उटीकमान,निग्रो अशा जातीच्या स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेतला आहे.थेट शेतातील स्ट्रॉबेरी व त्याची चव चाकून आपला अभिप्राय पर्यटकांनी दिलेला आहे.आणि या स्ट्रॉबेरीची खरेदी सुद्धा केलेली आहे.
असे असताना कुठल्यातरी बड्या भांडवलदार व उद्योजकांना खुश ठेवण्यासाठी चुकीची माहिती प्रसारित करून पर्यटक व शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. वास्तविक पाहता या गावांमध्ये स्थानिक आजूबाजूच्या गावातील स्ट्रॉबेरी घेऊन त्यातून जाम तयार करणाऱ्या कंपनीने आपल्या व्यवसायासाठी हा सर्व स्ट्रॉबेरी गाव जाहीर करण्याचा आटापिटा केलेला आहे असा आरोप करण्यात येत आहे.
खरं म्हणजे स्टोबेरी हे उत्पादन घेणारे शेतकरी हे प्रसिद्धीपासून अलिप्त आहेत.त्याचाच गैरफायदा घेऊन आता चुकीचा इतिहास पसरवला जात आहे. या विरोधात आता महाबळेश्वर तालुक्यातील शेतकरीच आक्रमक झालेले आहेत.त्यांनी या विरोधात प्रथमच आवाज उठवल्यामुळे या संपूर्ण महाबळेश्वर परिसरातील वस्तुनिष्ठ पाहणी करून नंतर निकष ठरवावे अशी मागणी करण्यात आलेली आहे. यावेळी महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी शेतकरी विजयकुमार भिलारे कासमभाई नालबंद,चंद्रकांत बावळेकर, दीपक बावळेकर,विष्णू बावळेकर,शरद बावळेकर, शंकरराव जांभळे,विष्णू गोळे आधी शेतकरी बांधव सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते.त्यांनी सातारा जिल्हाधिकारी श्री जितेंद्र दुडी यांना निवेदन देऊन आपली भूमिका मांडली आहे.दरम्यान,याबाबत महाबळेश्वर तालुक्यातील इतर गावांचा समावेश करण्याच्या प्रयत्नात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केला असल्याची माहिती मिळाली आहे.