मेढा पोलीस ठाण्यात दि.27/05/2024 रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी लालसिंग ज्ञानदेव शिंदे नोकरी/उप शेती रा.लिंब. ता.जि.सातारा यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये दि.8/06/2023 रोजी अजिंक्यतारा,प्रतापगड सहकारी साखर कारखाना सोनगाव करदोशी ता. जावली.यांच्यासोबत आरोपी क्र.१)तानाजी आनंदराव गावडे राहणार खाडज,ता.बारामती जिल्हा पुणे यांनी कारखान्याकरिता ऊस तोडणी मजूर व वाहतुकीकरता वाहने पुरवणे बाबत करार करून सदर कराराप्रमाणे वाहने व मजूर न पुरवता कारखान्याकडून बारा लाख रू ची उचल घेऊन कारखान्याची फसवणूक केली आहे.याबाबत मेढा पोलिस स्टेशन येथे फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यात आरोपी क्र१)तानाजी आनंदराव गाढवे रा. खाडज,ता.बारामती,जिल्हा.पुणे यास मेढा पोलीस ठाण्याचे स.पो.नि पृथ्वीराज ताटे सो यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी स.पो.नि.पाटील यांनी त्यांच्यासोबत पो.ना.कचरे,पो.कॉ.इंगवले यांनी सदर आरोपी तानाजी आनंदराव गावडे रा.खांडस,ता.बारामती, जिल्हा पुणे येथून अटक केली आहे.
सदर आरोपीस न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या कारवाईबाबत जावली तालुक्यातील सर्व स्तरावरून मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.