जावली तालुक्यातील शिंदेवाडी येथील सौ. दीपिका विवेक बेलोशे ही नवविवाहिता (वय २५) मुंबई येथून बेपत्ता झाली असून याबाबत नातेवाईकांनी मिरा -भाईंदर- वसई – विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत वालीव पोलीस ठाण्याच्या नायगाव बीट पोलीस चौकीत मिसिंग तक्रार दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की महाबळेश्वर येथील दीपिका जंगम हीचा विवाह शिंदेवाडी येथील विवेक शंकर बेलोशे याचेबरोबर तीन महिन्यांपूर्वी दोघांच्या संमतीने झाला आहे. त्यानंतर विवेक आपल्या पत्नीसह मुंबईला गेला. या ठिकाणी नोकरी करीत असताना ते दोघेही गाव तिवरी, नवकार सिटी, फेज ३, राजवाली- तिवरी रोड वसई येथे राहत होते. सर्व व्यवस्थित चालू असताना शुक्रवार दिनांक २ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता दीपिका मी मेडिकलमध्ये औषधे आणण्यासाठी जाते असे सांगून घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती घरी परत आलीच नाही.
कुटुंबीयांनी तिची सर्वत्र शोधाशोध सुरू केली परंतु ती कुठेच आढळून आली नाही. नातेवाईक, मित्र , मैत्रिणी यांचेकडे चौकशी केली असता ती कुठेच नसल्याचे समजल्यावर तिचा पती विवेक बेलोशे याने नायगाव पोलीस चौकीत आपली पत्नी हरवली असल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यानंतरही घरातील सर्वांनी तिचा गावी व मुंबई येथे शोध घेतला परंतु ती कुठेही सापडली नाही.
विशेष म्हणजे दीपिकाने आपला मोबाईल घरातच ठेवला असून तिने पैसेही नेले नाहीत. तिने फुलांचा पांढरा ड्रेस परिधान केला असून ती गोरी व लांब केस आहेत. अशा आशयाची विवाहिता
कुणाला सापडल्यास अथवा आढळून आल्यास त्वरित नायगाव पोलीस ठाणे अथवा 9765168811, 9765172472, 7666772805, 7021895901 यातील कुठल्याही मोबाईल नंबरवर कळवावे अशी विनंती कुटुंबीयांनी केली आहे.