संस्थापक श्री राजकुमार आनंदराव गोळे यांनी 1999 रोजी स्थापन केलेल्या श्री बाल गणेश क्रिडा मंडळाने या वर्षी रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केले.हा महोत्सव साजरा करत असताना बाप्पाची भव्य आगमन मिरवणूक करहर ते महू,सत्यनारायण महापूजा तसेच भव्य विसर्जन मिरवणूक अतिशय आनंदमय आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
मंडळाने संस्थापक, संस्थापक अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार तसेच सचिव व जेष्ठ सभासद यांचा आदरपूर्वक सन्मान केला. तसेच मंडळाला सुरुवतीपासून ज्या मुलींनी सहकार्य केले होते.त्या सर्व मुलींना त्यांच्या सासरी जाऊन निमंत्रित करून त्यांना साडी चोळी आणि समई देऊन त्यांचाही सन्मान करण्यात आला.
तसेच सातत्याने 25 वर्षे मंडळासाठी 100 टक्के योगदान देणाऱ्या श्री संदिप आनंदराव गोळे (बाळासाहेब) यांचा मंडळाने बाल गणेश मूर्ती व शाल सन्मानचिन्ह देऊन श्री बाल गणेश भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.मंडळातील महिलांनी बाप्पाला 24 तोळे चांदी व 1 तोळे सोने असा 25 तोळ्यांच्या हार, चांदीचा मुकुट,चांदीचे जास्वंदाचे फुल व चांदीचा दुर्वांचा हार बाप्पाला अर्पण करून मंगळागौर तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे लोकांनी सहभाग दाखवला.
तसेच मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत विभागातील यशस्वी सरकारी पदावर नियुक्ती झालेल्या व क्रिडा क्षेत्रात नावलौकिक कमावलेल्या तसेच उद्योग क्षेत्रात यश संपादन केलेल्या तरुण व तरुणींचा तसेच 10 दिवसात घेण्यात आलेल्या क्रिडा स्पर्धेतील यशस्वीतांचा सन्मानचिन्ह व बक्षीस देऊन सन्मान केला व ग्रामपंचायत महू यांना एक अद्यावत बेड लोकार्पण करण्यात आला.
रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करताना सर्व कमिटी व सभासद अतिशय मेहनतीने व मनलाऊन कार्य करताना दिसले.त्यामध्ये मंडळाचे संस्थापक श्री राजकुमार गोळे,अध्यक्ष श्री सागर श्रीरंग गोळे, उपाध्यक्ष श्री मिथुन काशिनाथ गोळे व खजिनदार श्री जयवंत हणमंत गोळे यांची मोलाची साथ मंडळाला व सर्व सभासदांना मिळाली.
शब्दांकन:- श्री सुशिल विष्णुपंत गोळे