करहर ता.जावली येथील डॉ.गोळे हाडवैद्य या गोंडस नावाखाली गोळे नामक व्यक्तीने अनधिकृत रित्या आरोग्य विभागाची कोणतीही परवानगी व प्रमाणपत्र न घेता राजरोसपणे सुरू केला आहे.नॅचरोपॅथी प्रॅक्टिस सांगून रुग्णांना परवानगी नसतानाही गोळ्या, मालिश तेल दिलं जाते.सदर गोळ्या,पावडर,मालिश तेल,मलम,हे कोणत्या कंपनीचे आहेत.आरोग्य विभागाच्या नियमानुसार या गोळ्या, पावडर,मलम रुग्णांना देण्याची परवानगी (अधिकार) आहे का? याचा खुलासा व्हावा.गोळया,पावडर,मलम मालिश तेल यामुळे भविष्य काळामध्ये रुग्णांच्या व मानवी आरोग्याला धोका पोहोचल्यास त्याला जबाबदार प्रशासन राहणार का ? तसेच कोणत्याही पद्धतीची पावती कोणत्याही पद्धतीची फाईल न करता रुग्णांकडून 1000/1300/1500 अशा पद्धतीची आर्थिक लूट सुरू आहे.तसेच मिळालेल्या माहितीनुसार सदर एका व्यक्तीच्या नावाने रीतसर प्रमाणपत्र आहे.मात्र मालिश करण्यासाठी कोणत्याही पद्धतीचे सर्टिफिकेट नसतानाही सातवी,आठवी, झालेल्या महिलांकडून त्यांच्याकडे सर्टिफिकेट नसतानाही रुग्णांची मालिश केली जाते.सदर गोरज धंद्यातून आर्थिक माया गोळे नी गोळा केली आहे.
तसेच सदर जिल्हाधिकारी सातारा सो यांना व आरोग्य कार्यलयाला दि.13/08/2024 रोजी तक्रार दिली होती.माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने गोळे हाडवैद्यवर कोणती कार्यवाही,चौकशी पाहणी अहवाल,अथवा कोणती कारवाई केली गेली नाही.तसेच त्या अहवालानुसार कोणती का कारवाई करण्यात आले नाही याचा खुलासा करून सदर नागरिकांची होणारी आर्थिक लूट करणाऱ्या गोळे हाडवैद्य यांचा गोरस बोगस धंदा बंद करून सील करावा.तसेच त्यांच्यावर बोगस डॉक्टर म्हणून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा वेळेत असे न झाल्यास लोकशाहीतील मार्गाने आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे किरण बगाडे यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे.
चौकाट:
प्रशासन कारवाई करणार की हाडवैद्यला पाठीशी घालणार ?
जावली तालुक्यातील करहर या ठिकाणी हाडवैद्य याच्या नावाखाली लोकांची मोठी आर्थिक लूट केली जात आहे.तसेच आरोग्य प्रशासनाने आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई या हाडवैद्य वर केली नाही.त्यामूळे सातारा आरोग्य विभागाच्या विरोधात मी लवकरच आरोग्य मंत्री यांच्या कडे तक्रार दाखल करणार आहे.तसेच येत्या काळात आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत.
किरण बगाडे
जिल्हा सचिव (रि.पा.इ A सातारा)