जावली तालुक्यातील कुडाळ येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मास निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कुडाळ यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सदिच्छा भेट दिली आहे.या शिबिरामध्ये रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवून रक्तदान केले.
युवकांच्या माध्यमातून बलिदान मास निमित्ताने रक्तदानासारखा राबविण्यात आलेला उपक्रम स्तुत्य असून निश्चितच समाजाच्यादृष्टीने हितावह ठरणारा आहे.आज कोणत्याही दानापेक्षा रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जात असून याची कोणतीच किंमत करता येत नाही.आपण केलेल्या या महान दानातून निश्चितच अनेकांचा जीव वाचणार आहे.यामुळे प्रत्येकाने रक्तदानासाठी पुढाकार घेणे ही काळाजी गरज आहे.
श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या 147 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी दिलेल्या बलिदानाची त्यागभावना जोपासत समाजाची नेमकी गरज ओळखून प्रत्येकाकडून रक्तदान करण्यात आले.यावेळीं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कुडाळ (जावळी)विभागातील सर्व धारकरी तसेच कुडाळ पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.