क्षेत्र कूसुंबी गावामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. यावेळी काळेश्वरी मंदिर,ग्रामपंचायत कार्यालय,प्राथमिक व माध्यमिक शाळा परीसरात स्वच्छता करण्यात आली.तसेच विविध प्रकारची देशी झाडे लावण्यात आली.या मोहिमेत सहभागी सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत कार्यकारीणी,पोलिस पाटील,काळेश्वरी देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक इतर शिक्षक, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक, विद्यार्थी तसेच इतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे केळघर शाखाधिकारी सुर्यकांत चिकणे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष चौधरी,प्रेमजित इंगवले, माजी अध्यक्ष व शाखाप्रमुख नामदेव चिकणे,शंकर चिकणे, बचत गटाच्या समन्वयक सौ.लक्ष्मी वेंदे व इतर महिला यांनी सहभाग नोंदवला होता.
यावेळी गावातील प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला.तसेच गावातील अनेक नागरीकांनी आपल्या घराच्या परिसराची स्वच्छता केली.आजच्या या मोहिमेत सहभागी सर्व स्वच्छता दुतांचे क्षेत्र कुसुंबी गावचे सरपंच मारुती चिकने यांनी आभार मानले.