जावली तालुक्यातील युवक-युवतींच्या करिअर व नोकरीला यशस्वी दिशा देणाऱ्या ‘निलेशा कंप्युटर्स मेढा’ने सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट कामगिरीचा सन्मान मिळविला आहे. ‘एमकेसीएल’च्या सातारा विभाग यांच्यावतीने आयोजित कौतुक व सन्मान सोहळ्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सारथी मार्फत देण्यात येणाऱ्या विविध कोर्सेसमध्ये सातारा जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल निलेशा कंप्युटर्स मेढा या केंद्राचा ‘एमकेसीएल’चे विभागीय समन्वयक अनिल गावंडे,जिल्हा समन्वयक विक्रम जाधव,पराग पालवे,अमोल पाटील, यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा नुकताच कराड येथे संपन्न झाला.
मराठा समाजातील १८ ते ४५ वयोगटातील सर्वांसाठी महाराष्ट्र शासन छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात सारथी व एमकेसीएल मार्फत राबविला जाणारा CSMS-DEEP हा युवकांची रोजगारक्षमता आणि स्वयंरोजगार क्षमता वाढविणारा सहा महिन्याचा कोर्स गेली दोन वर्ष यशस्वीपणे राबवून तरुणांना स्थानिक तसेच पुण्या -मुंबईमध्ये नोकरी मिळविण्यात यशस्वी ठरले. त्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शनपर सेमिनार आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्यासाठी पंधरा दिवसांचे कंपन्यामध्ये ट्रेनिंग दिले जाते. अल्पावधीतच विद्यार्थ्यांसह पालकांच्या पसंतीस उतरलेले जावली तालुक्यातील अत्याधुनिक सर्व सोयींनीयुक्त शासनमान्य संगणक प्रशिक्षण केंद्र म्हणजेच निलेशा कंप्युटर्स अशी ओळख निर्माण झाली आहे. त्यामागे मुलांना घडविणे ही एकच प्रेरणा प्रशिक्षकांची आणि संस्थाचालकांची आहे.
निलेशा कंप्युटर्स मेढाचे केंद्र संचालिका अधिका धनावडे म्हणाले, मेढा येथे शासकीय नोकरीसाठी आवश्यक ‘एमएस-सीआयटी’ त्याबरोबर ‘टॅली ९.०’ आणि ‘प्राईम’, ‘अडव्हांसड एक्सेल’, ‘स्पोकन इंग्लिश’, ‘फोटोशॉप’ व ‘व्हिडिओ एडिटिंग’, ‘प्रोग्रामिंग लँग्वेजेस’मध्ये सी, सी++, जावा, पायथॅान सारखे अत्याधुनिक कोर्सेस अत्यंत माफक फी मध्ये तज्ञ मार्गदर्शकांकडून शिकविले जातात. या बरोबरच महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकासअंतर्गत मोफत कोर्सेससाठीही प्रवेश सुरु असल्याचे यांनी सांगितले.