शिवाजी विद्यापीठांतर्गत श्री नृसिंह शिक्षण प्रसारक मंडळ,इंदोली संचलित कै.रामराव निकम शिक्षणशास्त्र बी.एड महाविद्यालय,इंदोली ता.कराड या महाविद्यालयातील “स्नेहदीप” गट कोरेगाव यांनी शालेय आंतरवासिता टप्पा क्र.2 या प्रात्यक्षिकाचे उद्घाटन व वृक्षारोपण कार्यक्रमाचे “श्री मुधाईदेवी विद्यामंदिर,देऊर ता.कोरेगाव या महाविद्यालयात करण्यात आले.यावेळी श्री मुधाई देवी शिक्षण संस्थेचे चेअरमन हणमंतराव कदम,विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप ढाणे तसेच सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
आंतरवासिता टप्पा क्र.2 प्रात्यक्षिक करण्यासाठी बी.एड महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील.एस.एस उपस्थित होते तसेच प्राध्यापक सौ.बोर्डे,सौ.थोरात, सौ.देसाई मॅडम,अजय बोतालजी सर यांनी मार्गदर्शन केले.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्रअध्यापिका भाग्यश्री सपकाळ तर आभार प्रदर्शन छात्रअध्यापिका पंचमी सोनावणे यांनी मानले.तसेच कार्यक्रमाचे नियोजन स्नेहदीप गटाचे छात्रअध्यापक मुख्याध्यापक निखिल चव्हाण,पंकज चव्हाण,आवताडे बापू, सुनील जरे,विजय अडसूळ,धनश्री राजे,शामल भिसे,ज्योत्स्ना बोधे यांनी केले.