राज्यातील शेतकर्यांच्या आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी भारतीय जवान किसान पार्टी व शेतकरी संघटनेने शुक्रवार दि. ९ ऑगस्ट रोजी पुण्यात ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात कराड उत्तर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष वसीम इनामदार यांनी मंगळवारी सायंकाळी सहा वाजता पत्रकारांशी बोलताना दिली.
कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील तारगाव येथून कोल्हापूर-पुणे पॅसेंजरने शेतकरी मोर्चासाठी पुण्याकडे रवाना होणार आहेत. ऊस उत्पादक शेतकर्यांसह अन्य शेतकर्यांच्या न्यायहक्कासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. शेतकरी संघटनेचे नेते यावेळी उपस्थित राहून सरकारला जाब विचारणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
कराड उत्तरमधील शेतकर्यांनी तारगाव येथून रेल्वेने पुण्यासाठी जायचे असल्याने रात्री ८ वाजता रेल्वे स्टेशनवर जमावे, तेथून एकत्ररित्या पुण्याकडे जायचे आहे, शेतकर्यांनी याची नोंद घ्यावी व जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन इनामदार यांनी केले आहे.